आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ताज\'वरुन आझम खान संतप्त, म्हणाले - राष्ट्रपती भवनही पाडा; CM योगींची आता अशी सारवासारव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगात भारताची ओळख असलेल्या ताजमहालचा उल्लेख उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या बुकलेटमधून वगळण्यात आला होता. त्यावरुन राज्यात बराच वाद झाला. आता राज्यातील भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे सांगत तो गद्दारांनी बांधला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे.  आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी या वादात उडी घेतली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून आता सीएम योगींनी 'ताज' भेटीचा निर्णय घेतला आहे. 
 
काय म्हणाले आझम खान 
ताजमहालावरुन संगीत सोम यांनी सुरु केलेल्या वादाला उत्तर देताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान म्हणाले, राष्ट्रपती भवन देखील पाडले पाहिजे, कारण तेही इंग्रजांनी बांधले होते. ते देखील गुलामीचे प्रतिक आहे. 
 
26 ऑक्टोबरला योगी आदित्यानाथ देणार 'ताज'ला भेट 
भाजपचे एक आमदार ताजमहाल कलंक असल्याचे म्हणत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबरला ताजमहाल भेटीसाठी जाणार आहेत. 
- ताजमहालच्या निर्मितीमध्ये भारतीयांचे रक्त आटले आहे. सर्व धर्मिक आणि पुरातत्व महत्त्वाच्या इमारतींचे संरक्षण झाले पाहिजे त्यांचे महत्त्व वाढवले पाहिजे. त्यासाठी ताजला जाणार असल्याचे योगींनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...