आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- उत्तर प्रदेशचे नगर विकास मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. गुजरातमधील मुस्लिम नागरिकांनी नरेंद्र मोदींना मत दिले नाही तर त्यांच्यावर अॅसिड टाकून जाळले जाईल. मुस्मिम नागरिकांमध्ये मोदींची प्रचंड दहशत आहे. यामुळे त्यांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. रक्ताने हात माखलेला व्यक्ती पंतप्रधान कधीच होऊ शकत नाही, असेही आझम खान यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुकांची रणधुमाळी एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेतही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात टीकांचे बाण सर्वत्र सोडताना नेते दिसत आहेत.
आझम खान म्हणाले, देशातील जनतेला गुजरातमधील इतिहास माहीत आहे. विशेष म्हणजे सन 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगतील काय झाले? हेही जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविले जात आहे.
गुजरातमध्ये राहायचे असेल, तर मोदींनाच मत दिले पाहिजे, अशी भाजपची नीती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.