आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.A.And B.Sc Course Shut Down, University Grants Commission Work Towards

बी.ए. आणि बी.एस्सी. बंद होणार; विद्यापीठ अनुदान आयोगाची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - बी.ए. आणि बी.एस्सी हे अभ्यासक्रम आता कालबाह्य झाले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ते बंद करण्याची तयारी चालवली आहे. पहिल्या टप्प्यात 200 महाविद्यालयांत या जागी नवा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू होईल.यूजीसीचे उपाध्यक्ष एस. देवराज यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, नव्या अभ्यासक्रमांना बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन कोर्स या नावाने ओळखले जाईल. दहा वर्षात टप्प्याटप्प्याने ते देशात लागू होतील. उद्योगविश्वाच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. बी.ए., बी.एस्सी.तून बेरोजगारांची फौज तयार होत आहे, असे यूजीसीचे म्हणणे आहे. या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे युजीसीच्या ऑटोनॉमस कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष ब्रह्मभट्ट म्हणाले.2015-16 पासून नवा अभ्यासक्रम : नवा प्रस्तावित अभ्यासक्रम 2015-16 या शैक्षणिक वर्षात लागू करण्याची यूजीसीची तयारी आहे.