आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.ed Now Two Years, NCTE Step Up For Changing Syllabus

बीएड आता दोन वर्षांचे, एनसीटीईकडून बीएडचा अभ्यासक्रम बदलाची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक सत्रापासून देशभरात बीएडसाठी (बॅचलर ऑफ एज्युकेशन) दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला जाण्याची शक्यता आहे. सध्या हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. त्यात नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून (एनसीटीई) बदल केला जाण्याची शक्यता असून नवा येत्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याची तयारी सुरू आहे.

एनसीटीईच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बीएडचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचा एकत्रित अभ्यासक्रम करावा, अशी मागणी देशभरातील शिक्षण तज्ज्ञ व शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत होती. त्यानुसार बीएड अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. सध्याच्या काळाची गरज ओळखून हा अभ्यासक्रम तयार केला जात आहे. त्याच बरोबर देशातील कुशल शिक्षकांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही रचना असणार आहे. देशभरात पुढील शैक्षणिक सत्रापासून हा बदल लागू केला जाऊ शकतो. शिकवणारे सर्व महाविद्यालये व विद्यापीठांत हा बदल लागू करावा लागेल. विशेष म्हणजे सुरुवातीला बीएडचा अभ्यासक्रम दोनच वर्षांचा होता. नंतर बदलून तो वर्षाचा करण्यात आला होता.

बदलाचा उद्देश
१. बीएडची पदवी बारावीनंतर पाच वर्षांनी मिळेल. कारण त्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अनिवार्य असेल.
२. बीई(चार वर्षे) व एमबीबीएसप्रमाणेच (साडेपाच वर्षे) बीएड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षकांची फळी उभी करणे शक्य.

बदल अशा स्वरूपाचा
-बीएड अभ्यासक्रम दोन वर्षांचा करणार
-अभ्यासक्रम सध्याच काळाची गरज ओळखून अपग्रेड होणार
-प्रत्येक विद्यार्थ्याला तीन वर्षांत बीए क्लीअर करणे आवश्यक
-दरवर्षी वर्गात ८० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार
-व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालयांत प्रत्येक २५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक अनिवार्य.