आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस्सी यांनी पुन्हा केली चूक, बनावट अकाउंटला उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे पोलिस आयुक्त बीएस बस्सी ट्विटर अकाउंटवरून सातत्याने चर्चेत असतात. त्यांनी याअगोदर २६/ ११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या बनावट अकाउंटला खरे समजून प्रतिसाद दिला होता. या वेळी त्यांनी पत्रकार रवीश कुमार यांच्या नावावरून तयार करण्यात आलेल्या बनावट अकाउंटवर उत्तरादाखल ट्विट करून संताप काढला.

रवीश कुमार ऑगस्ट २०१५ पासून ट्विटरवर सक्रिय नाहीत. त्यांचे अखेरचे ट्विटदेखील २२ ऑगस्टचे आहे. त्यानंतर त्यांच्या नावाने एक बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्या अकाउंटवरील पोस्टवर बस्सी भडकले. रवीश आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. आपली बांधिलकी खाकीशी आहे. त्या वेळी ते नेमके वर्दीबद्दल बोलतायत की निकरविषयी, अशा आशयाची पाेस्ट त्यावर होती.