आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या पैशांवर बोललो तर अण्णांसारखी अवस्था होईल, रामदेवबाबांना भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/कोल्हापूर - युपीए सरकारच्या कार्यकाळाता काळ्या पैशाच्या विरोधात रान पेटवणार्‍या रामदेव बाबांनी आता मात्र या मुद्यावर शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर आणखी बोललो तर आपली अवस्थाही अण्णा हजारेंसारखी होईल, अशा शब्दांत रामदेव बाबांनी मनातली भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत रामदेव बाबांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे शंभराहून अधिक व्यक्तींना या नागरी सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी नावे अंतिम करण्यात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा त्यात समावेश आहे. गृहमंत्रालयाने मात्र याबाबत काहीही अधिकृतरित्या स्पष्ट केलेले नाही. दरवर्षी 25 जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. त्यामुळे माध्यमांतील बातम्या केवळ अंदाजावर आधारित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पद्म पुरस्कारांच्या यादीत पत्रकार रजत शर्मा, अडवाणीही
भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, योगगुरू रामदेव बाबा यांना पद्म पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय सरकरने घेतला आङे. त्यांच्यासह एकूण शंभर जणांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यादीत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, गीतकार प्रसून जोशी आणि पत्रकार रजत शर्मा यांच्या नावांचाही समावेश आहे. ज्यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, त्यापैकी अनेकजण भाजपचे शुभचिंतक आहेत. तसेच काही अशा व्यक्तींचीही नावे आहेत, जी आगामी काळात भाजपचे समर्थक बनू शकतात. एनसीईआरटीचे माजी संचालक जेएस राजपूत यांचे नावही या यादीत आहे.

पुढे वाचा, रामदेव बाबा म्हणाले बोललो तर अण्णांसारखी स्थिती होईल....