आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांची स्वदेशी मॅगीची घोषणा, म्हणाले- नेस्लेने देशाची माफी मागावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोशल मीडियावर हा फोटो खुप शेअर केला जात आहे.)

नवी दिल्ली- भारतात मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर बाबा रामदेव यांनी स्वदेशी मॅगी आणण्याची घोषणा केली आहे. रामदेव म्हणाले, की पतंजलिच्या माध्यमातून नुडल्स बाजारपेठेत आणले जातील. ते आरोग्यवर्धक असतील. त्यात प्रमाणपेक्षा जास्त मैदा नसेल. मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीने देशाची माफी मागायला हवी. सरकारने कठोर भूमिका घेतली तर या कंपनीला देशातून बाहेर जावे लागेल.
रामदेव म्हणाले, की नेस्लेची मॅगी लहान मुलांमध्ये विशेष करुन प्रसिद्ध होती. तोच स्वाद आणि आवड लहान मुलांना देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. स्वदेशी मॅगीत कोणतेही हानिकारक तत्त्व नसतील. स्वदेशी खाद्यपदार्थ वापरण्यासाठी लोकांना प्रेरित करणे आमचा उद्देश आहे. कमी किमतीत चांगल्या क्वालिटिचे प्रोडक्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी देशातील लोकांना आवाहन करतो, की त्यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आमच्या मुलांना विष देणारी कंपनी आम्हाला नको. नेस्लेच्या मॅगीने देशाचे मोठे नुकसान केले आहे.
बनावट आहे पतंजलिच्या मॅगीचा फोटो
नेस्लेच्या मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर पतंजलिच्या मॅगीच्या पाकिटाचे चित्र सोशल मीडियावर खुप फेमस झाले होते. बाबा रामदेव यांच्यामुळे नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातली गेली आहे, असेही काहींनी सांगितले होते. पण हे वृत्त रामदेव बाबा यांनी फेटाळून लावले आहे. पतंजलि ट्रस्ट सध्या नुडल्स तयार करीत नाही, असेही त्यांनी ट्विटरवर सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, नेस्लेच्या मॅगीवर बंदी घातल्यानंतर आज #विश्व_पोहा_दिवस ट्विटरवर ट्रेंड करताना दिसून येत आहे...या संदर्भातील जोक्स पुढील स्लाईडवर...