आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा रामदेव यांची हिथ्रो विमानतळावर अनेक तास चौकशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- योगगुरु बाबा रामदेव यांची लंडनच्‍या हिथ्रो विमानतळावर अनेक तास चौकशी करण्‍यात आली आहे. बाबा रामदेव यांना विमानतळावर ताब्‍यात घेण्‍यात आले होते. सीमाशुल्‍क विभागाच्‍या अधिका-यांनी त्‍यांच्‍या सामानाची झडती घेतली. त्‍यानंतर त्‍यांना सोडून देण्‍यात आले. ही घटना स्‍थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्‍या सुमारास घडली.

प्राप्‍त माहितीनुसार, बाबा रामदेव इंग्‍लंडमध्‍ये स्‍वामी विवेकानंद यांच्‍या 150 व्‍या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्‍हणून सहभागी होण्‍यासाठी गेले आहेत. लंडनच्‍या विमानतळावर अधिका-यांना संशय आला. बाबा रामदेव यांच्‍याकडी संस्‍कृत भाषेतील पुस्‍तकांवरुन अधिका-यांना संशय आला होता. या पुस्‍तकांमध्‍ये काय लिहीले आहे, हे जाणून घेणसाठी संस्कृतच्‍या जाणकार लोकांना बोलाविण्‍यात आले. त्‍यामुळे तपासणीला विलंब झाला. सुमारे 4 तास इमिग्रेशन विभागाच्‍या अधिका-यांनी त्‍यांची चौकशी केली. त्‍यानंतर कस्‍टम्‍स अधिका-यांना त्‍यांच्‍याकडील औषधांवरुन संशय निर्माण झाला. त्‍याबाबतही चौकशी करण्‍यात आली.

इंग्‍लंडमध्‍ये पतंजली योगपीठातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत. त्‍यानंतर बाबा रामदेव अमेरिकेतही विविध कार्यक्रमांमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी जाणार आहेत.