आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी घरातच पूजा करावी, मध्य प्रदेशचे गृहमंत्री गौर यांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ नवी दिल्ली- शनिशिंगणापुरातील शनी चौथऱ्यावर जाण्यास महिलांना असलेल्या बंदीवरून सध्या वादळ उठलेले असतानाच महिलांनी घरातच पूजा केली तरी खूप झाले, असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांनी केले आहे. शनिशिंगणापुरातील महिलांच्या प्रवेशबंदीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे विधान केले. नंतर मात्र आपण असे काही बोललोच नाही,

असे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, हा मुद्दा समाजावरच सोडून द्या. महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा की नाही, हे समाजाने स्वत:च ठरवावे. त्यावर कोणतीही राजकीय टिप्पणी होऊ नये, असे मनेका गांधी म्हणाल्या.