आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पडताळणी वेळेत न झाल्यास कारवाई, नव्या दिशानिर्देशांना अंतिम रूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या जात प्रमाणपत्रांची वेळेत पडताळणी न केल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. केंद्राने यासंदर्भात नव्या दिशानिर्देशांना अंतिम रूप दिले आहे.

केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने हे दिशानिर्देश तयार केले आहेत. ते लागू झाल्यास राखीव प्रवर्गातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सर्व राज्यांना विशिष्ट कालमर्यादा घालून द्यावी लागेल. एससी, एसटी आणि ओबीसी या राखीव प्रवर्गातील व्यक्तींसाठी आरक्षित नोकऱ्यांवर इतरांची नियुक्ती रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सर्व जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना वेळेत जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची खातरजमा करण्यास याआधीच सांगण्यात आले आहे. वेळेत पडताळणी न करणाऱ्या अथवा खोटी जात प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे या निर्देशांत नमूद आहे.
बातम्या आणखी आहेत...