आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ म्हणाले - 'जे कधी पाया पडत होते, वाईट दिवस येताच त्यांनी घरी येऊन नाव ठेवले'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक समजले जाणारे ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नव्वदच्या दशकातील खराब आर्थिक स्थितीत लोक कसे वागत होते याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'जे माझ्या पाया पडत होते, ते लोक माझे दिवस वाईट होते तेव्हा घरी येऊन मला शिव्या देत होते. नावे ठेवत होते.' त्याचवेळी त्यांनी मित्रत्वाचे नाते कायम असते असेही स्पष्ट केले.

कधीकाळी आमचे 'छोटे बंधू' असा ज्यांचा उल्लेख बच्चन करत होते, त्या अमर सिंह यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यांवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, 'जी व्यक्ती एकदा माझी मित्र झाली तिच्यासोबत कायमचे मित्रत्व असते.' तसेच ते म्हणाले, 'अमरसिंहाचा मी नेहमीच आदर केला आहे. ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मी त्यांना पाहाण्यासाठी गेलो होतो.' काही दिवसांपूर्वीच अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल 'ते बागबान नसून बागिचा उजाडणारे आहेत', असे म्हटले होते. एवढ्यावरच अमर सिंह थांबले नव्हते तर त्यांनी'जर मी साथ दिली नसती तर संपूर्ण बच्चन कुटुंब तुरुंगात असते', असा दावा केला होता.
खासगी इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊचे अँकर अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले, 'मी आर्थिक सक्षम नाही, त्यामुळे काम करणे ही माझी गरज आहे. माझ्यावर खूप कर्ज आहे, त्यामुळे मला काम करत राहावे लागेल.' त्यांनी देशवासियांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि कोणत्याही परिस्थिती साथ सोडली नाही त्यासाठी आभारी असल्याचे म्हटले आहे.

तीन-चार वर्षांची सुटी घेणे घोडचूक
अमिताभ बच्चन स्वतःच्या दिवाळखोरीबद्दल सांगताना म्हणाले, नव्वदच्या दशकात मी काम करणे बंद केले. मला वाटले आता आपल्याला काम करण्याची गरज नाही. मी तीन-चार वर्षांची सुटी घेतली. ही माझी मोठी घोडचूक ठरली. त्याच दरम्यान नव्या पिढीने जागा काबिज केली. जेव्हा मला कामाची गरज भासली आणि मी परत आलो तेव्हा पुला खालून बरेच पाणी वाहून गेले होते. मला रोलसाठीही संघर्ष करावा लागला. मोठ्या कष्टाने यशराज बॅनर्सच्या 'मोहब्बतें' मध्ये मला साइन करण्यात आले.
न्यायप्रविष्ट प्रकरणांवर बोलल्याण्याचे टाळले
बॉलिवूड स्टार्सच्या सुरु असलेल्या कोर्ट - कचेऱ्यांवर बोलण्याचे त्यांनी टाळले. त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ' मी कधीही कायद्याच्या विरोधात काम केले नाही आणि जेव्हा कधी असे झाले तेव्हा त्याचा भूर्दंड सहन केला आहे. कधी-कधी तुम्ही न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर काही बोलू शकत नाही.' काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टार्स सलमान खानला मुंबई सेशन्स कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर बॉलिवूडमधील लहान - मोठ्या सगळ्या कलाकारांनी त्याच्याबद्दलचा आपलेपणा दाखवत त्याची भेट घेतली होती. यादरम्यान बच्चन कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती.