आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जपानी पार्कवरील सभेची जय्यत तयारी केलेली असतानाच दिल्लीमध्ये मोदींविरोधात प्रचार मोहीम राबवण्यात आली. मोदींना ‘फेकू’ संबोधणारी पत्रके भल्या पहाटेच वृत्तपत्रांतून वाटण्यात आली आणि होर्डिंग्ज लावण्यात आल्या होत्या. या पत्रकांमध्ये मोदींना ‘फेकू’ संबोधण्यात आले होते.
मोदींच्या दिल्ली दौºयाची खिल्ली उडवत ‘आया आया फेकू आया..’ अशी मोदींची संभावना करत पत्रके आणि होर्डिंग्जमध्ये दिल्ली आणि गुजरातच्या विकासाची तुलना करण्यात आली होती. मोदींच्या विरोधातील पत्रके आणि होर्डिंग्जवर मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव नव्हते. भाजपने मात्र त्यासाठी काँग्रेसलाच जबाबदार धरले असून घाणेरड्या राजकीय संस्कृतीचे हे प्रदर्शन असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस मोदींना घाबरली असून त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आमच्या नेत्याविरुद्ध काँग्रेसने लावलेल्या होर्डिंग्जने वाईट वाटले, असे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मोदींच्या सभेच्या प्रचारासाठी भाजपने लावलेल्या पोस्टरमध्ये मोदींना ‘भारत माँ का शेर’ संबोधण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी त्यांना ‘फेकू’ संबोधले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.