आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badaun Rape Case News In Marathi, Divya Marathi, Uttar Pradesh

तपास अहवालात मुलींवर अत्याचार झालेलाच नाही, बदायूं प्रकरणाला कलाटणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातखळबळ उडवून देणाऱ्या बदायूं सामूहिक अत्याचार प्रकरणाला बुधवारी वेगळीच कलाटणी मिळाली. नवीन तपास अहवालात दोन्ही मुलींवर अत्याचार झालेलाच नाही, असा दावा करण्यात आलेला आहे.

हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए-फिंगरप्रिंिटंग आणि डायग्नॉस्टिक (सीडीएफडी) सेंटरने हा अहवाल दिला आहे. अहवालामुळे संशयाची सुई आता मुलींच्या नातेवाइकांवर येऊन थांबली आहे, असे सीबीआय सूत्रांचे म्हणणे आहे. ऑनर किलिंगचीही शक्यता गुप्तहेर संस्थेने फेटाळलेली नाही. आता सीडीएफडीचा अहवाल तीनसदस्यीय वैद्यकीय समितीकडे पाठवण्यात आला.

मृतदेहांचेपुन्हा शवविच्छेदन नाही :नवीन अहवाल आल्याने मृतदेहांची पुन्हा उत्तरीय तपासणी केली जाणार नाही. या घटनेशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. गंगा नदीला पूर असल्याने मुलींच्या कबरीवरही पाणी आहे. त्यामुळे कबरी पुन्हा खोदण्यात येणार नाहीत, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले.दाेन्ही बहिणींवर अत्याचार झाला नसल्याचा अहवाल