आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badrinath Temple Main Pujari Arrested For Molestation

बद्रीनाथ मंदिराचा पुजारी विनयभंगप्रकरणी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बद्रीनाथ धामचे मुख्य पुजारी रावल केशव नंबुद्रीला एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात मंगळवारी अटक केली आहे. दिल्लीतील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने रावलची मुख्य पुजारी पदावरून हकालपट्टी केली. संबंधित महिला रावलच्या आधीपासून ओळखीची आहे. याआधीही ती त्याला भेटली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
तथापि, महिलेच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री रावलने तिला फोन केला. रावल महरौलीच्या हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलमध्ये येण्यासाठी त्याने तिच्याकडे टॅक्सी पाठवली. तेथे रावलने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास विरोध करत आरडाओरड केली. दरम्यान, उत्तराखंड सरकारने या प्रकरणात हात झटकले आहेत. कायदा आपले काम करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दिली आहे.