आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badrish Dutt Had Killed Geeta And Then Shot Himself

सुपरकॉप बद्रीशने लिव्‍ह इन पार्टनर गीताची हत्‍याकरुन स्‍वतःवर झाडली गोळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली पोलीस दलातील सुपरकॉप बद्रीश दत्त आणि त्‍यांच्‍या लिव्‍ह इन पार्टनर गीता यांच्‍या मृत्‍यूचे रहस्‍य उलगडले आहे. बद्रीश दत्त यांनी सर्वप्रथम गीताची गोळी मारुन हत्‍या केली. त्‍यानंतर त्‍यांनी आत्‍महत्‍या केली. बद्रीश यांच्‍या हातावर गन पावडर आढळली आहे. त्‍यावरुन त्‍यांनीच गोळी झाडल्‍याचे स्‍पष्‍ट होते. शवविच्‍छेदन अहवालात हे स्‍पष्‍ट झाले आहे. गीताच्‍या हातावर गन पावडर आढळली नाही.

रविवारी सकाळी बद्रीश आणि गीता यांचे मृतदेह गुरगाव येथील एका घरात आढळले होते. दोघेही लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये राहत होते. डॉक्‍टरांनी सर्वप्रथम बद्रीश यांचे शवविच्‍छेदन केले. बद्रीश आणि गीता यांनी शुक्रवारी रात्री 11.30 च्‍या सुमारास सोबत जेवण घेतले. त्‍यानंतर रात्री 1 ते 2 वाजताच्‍या सुमारास दोघांचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी गुरगाव आणि दिल्‍ली पोलिस तपास करीत आहे.

सर्वप्रथम गीतावर बद्रीश यांच्‍या हत्‍येचा संशय व्‍यक्त करण्‍यात येत होता. बद्रीश यांना मारल्‍यानंतर तिनेही आत्‍महत्‍या केली असावी, असा संशय होता. बद्रीश हे दिल्‍ली पोलिसांच्‍या दहशतवाद विरोधी सेलमध्‍ये होते. तर गीता शर्मा ही एक खासगी डिटेक्टीव्‍ह एजेंसी चालवित होती.

फोटो- गुरगाव येथील याच घरात बद्रीश आणि गीता यांची हत्‍या झाली. इनसॅटमध्‍ये बद्रीश दत्त