आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी हिंसक जनावर, मानसिक रुग्ण, म्हणाले कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मनुष्याच्या वेशातील बीस्टच (हिंसक जनावर) एखाद्याच्या आजाराचा उल्लेख करू शकतो. यावरून असे सिद्ध होते, की ते मानसिक रुग्ण आहेत, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद म्हणाले आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आजारी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना शकील अहमद यांनी कठोक शब्दांचा प्रयोग केला आहे.
कॉंग्रेसचे आणखी एक प्रवक्ते मीम अफजल म्हणाले आहेत, की नरेंद्र मोदी आणखी किती खालच्या स्तराला जातील? त्यांनी किमान आपल्या पक्षाचा विचार करायला हवा. या वक्तव्यासाठी मोदींनी देशाची माफी मागायला हवी. अपमानकारक भाषेचा वापर केल्यानंतर माफी मागणे हा मोदींचा स्वभाव नाही. त्यांच्याकडून मर्यादेची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. अवघ्या देशाला माहित आहे, सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली आहे. एखाद्याविरुद्ध वैयक्तिक टिप्पणी करणे योग्य नाही.
केंद्रीयमंत्री म्हणाले, देशाला "खुनी इंसान"पासून वाचवावे लागेल...