आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी शर्यतीला परवानगी, पुन्हा दिसेल फुरफुरणारे श्वास आणि जमीन उकरणारे पाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील पारंपरिक बैलगाडी शर्यतीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डिसेंबर 2014 मध्ये दिलेला शब्द गुरुवारी पूर्ण केला आहे. बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्रातील संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे. तो जपण्यासाठी या बैलगाडी शर्यतीत क्रौर्य होता कामा नये, या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी साताऱ्याच्या बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने प्रयत्न केले होते.

का घालण्यात आली होती बंदी

- प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल संघटनेचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात 2004 मध्ये याचिका दाखल करुन बैल व घोडे यांच्या शर्यतीवर बंदीची मागणी केली होती.
- औरंगाबाद खंडपीठाने 2007 मध्ये अंतरिम निर्णय देऊन अहमदनगर जिल्ह्यात बैल व घोडा यांच्या शर्यतीवर बंदी आणली होती.
- 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने पाच प्राण्यांच्या प्रदर्शन आणि शर्यतीवर बंदी घातली होती.
- त्यात वाघ, माकड, बिबट्या, अस्वल आणि सांड यांचा समावेश होता.
- 11 जुलै 2011 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी करुन वाघ, सिंह, चित्ता, अस्वल आणि बैल यांच्या प्रदर्शन आणि शर्यतीवर बंदी आणली होती.
- सांड याचा अर्थ बैल घेण्यात आल्याने बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली, असा आक्षेप बळीराजा प्राणी आणि बैलगाडी शर्यत बचाव समितीने घेतला होता.
- सातारा येथील बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने वारंवार मोर्चे, आंदोलने करुन शासन दरबारी चुकीचा अर्थ घेऊन घालण्यात आलेली बंदी रद्द करण्याची मागणी केली होती.
- बैल हा पाळीव प्राणी असून बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आहे.
पुढील स्‍लाइडमध्‍ये पाहा, शंकरपटाचा थरार..