आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलुच नेते म्‍हणाले- मोदींनी आमचा मुद्दा उचलला तेव्‍हापासून पाकिस्‍तान घाबरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बलुचिस्तानच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व करत असलेले नेते मेहरान मारी यांनी म्‍हटले की, नरेंद्र मोदी जेव्‍हापासून बलूचिस्तानच्‍या मुद्द्यावर सार्वजनिक मंचावर बोलतात, तेव्‍हापासून पाकिस्‍तानला भीती वाटत आहे. मेहरान हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगानचे बलूचिस्तानचे प्रतिनिधी आहेत.

काय म्‍हणालेे मेहरान..
- एएनआय या वृत्‍तसंस्‍थेला दिलेल्‍या मुलाखतीत मेहरान म्‍हणाले, "जेव्‍हापासून मोदींनी बलुचिस्तानच्‍या मुद्द्याचा उल्‍लेख केला, तेव्‍हापासून पाकिस्तानच्‍या आर्मीमध्‍ये दहशत आहे. त्‍यानंतर बलूचिस्तानातील कित्‍येक भागातील आर्मी ऑरपेशन्सवर लक्ष दिले जात आहे." मोदी यांनी स्‍वातंत्र्यदिनी पहिल्‍यांदाच बलूच्‍या लोकांच्‍या अत्‍याचाराचा भाषणात उल्‍लेख केला होता.
आम्‍ही भारताचे आभारी आहोत..
- मारी म्‍हणाले, "भारताने आमचे प्रश्‍न जगासमोर मांडले त्‍यामुळे मी आणि बलुचिस्तानचे लोक आम्‍ही भारताचे आभारी आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, बलुचिस्‍तानच्‍या प्रश्‍नावर भारत गंभीर आहे."
- याबाबतच्‍या अमेरिकेच्‍या भूमिकेवर मेहरान यांची नाराजी आहे. ते म्‍हणाले, " आम्‍ही अमेरिकेला अपील करतो की, त्‍यांनी भारत आणि अफगाणिस्तानप्रमाणे पाकबाबत आपली भूमिका बदलावी."
बातम्या आणखी आहेत...