आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदींच्या भाषणानंतर PAK कडून बलूचमध्ये केमिकल वेपन्सचा वापर, जनावरांसारखा कत्लेआम\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बलूचिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या नायला कादरी यांनी पाकिस्तान सैन्याबद्दलचा खळबळजनक खुलासा केला आहे. नायला यांचा दावा आहे की मोदींनी भारतीय स्वातंत्र्यदिनी दिलेल्या भाषणानंतर पाकिस्तान बलूचिस्तानमध्ये केमिकल वेपन्सचा वापर करत आहे. या हल्ल्यांमध्ये दररोज 100 हून अधिक लोक मारले जात आहेत. पाक आर्मीने येथे जनावरांना मारावे असा कत्लेआम सुरु केला आहे. 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरुन मोदींनी त्यांच्या भाषणात बलूचिस्तानचा उल्लेख केला होता.

नायला म्हणाल्या, 15 ऑगस्टलाही केमिकल वेपन्सचा वापर
- न्यूज चॅनल 'न्यूज नेशन'च्या रिपोर्टनुसार, बलूच नेत्या नायला कादरी म्हणाल्या, 'हे काही नवीन नाही. मोदींनी बलूचचा उल्लेख केल्यापासून पाक आमच्यासोबत कसे वागत आहे, हे मीडिया पाहात आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात आम्हाला पाठिंबा दर्शविला होता, तेव्हापासून बलूचिस्तानमध्ये कत्लेआम सुरु झाला आहे. पाकिस्तान दररोज 100 लोखांचा खून करत आहे.'
- कादरी यांनी सांगितले, की पाक आर्मी लोकांना असे मारत आहे जणू काही जनावरांचा कत्लेआम करावा. आमची लहान मुले दिवसाढवळ्या मारली जात आहेत.
- केमिकल वेपन्सचाही वापर होत आहे. 15 ऑगस्टलाही करण्यात आला होता. मकरान येथील सायजी डोंगरावरही केमिकल वेपन्सचा वापर झाला होता.
त्या ठिकाणी ज्या बलूची नागरिकांची डेडबॉडी सापडली ती केमिकलच्या वापरामुळे ओळखायला येत नाही.

मुलांचे ऑर्गन्स काढून घेतले जात आहे
- नायला यांनी दावा केला, की पाकिस्तानी आर्मी आमच्या मुलांना घेऊन जात आहे आणि त्यांचे डोळे, हार्ट काढून घेत आहे.
- याआधी पाकिस्ताने चीनच्या सहकार्याने बलूचमध्ये अणुचाचणी केली होती. त्यानंतर 6 वर्षे आमच्या येथे पाऊस झाला नव्हता. दुष्काळ पडला आणि पाणी विषारी झाले होते.
पाकच्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ मिळतील काय, याची विचारणा केल्यानंतर नायला म्हणाल्या, 'याचे व्हिडिओ आणि फोटोही मिळतील. मात्र सध्या तिथे मीडियाचा ब्लॅक आऊट आहे. मात्र तरीही काही वेबसाइट्स 'बलूच वर्ना', 'फंगर', 'रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान', 'हमगाम' या साइट्सवर बऱ्याच गोष्टी पाहायला मिळू शकतात.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहेत नायला कादरी...
बातम्या आणखी आहेत...