आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सुसाइड गेम ‘ब्ल्यू व्हेल’ चॅलेंजवर सरकारची बंदी, असे करणारा भारत पहिलाच देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुलांना आत्महत्येला प्रवृत्त करणारा गेम ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’वर सरकारने बंदी घातली आहे. गेमच्या जाळ्यात अडकल्यामुळे मुंबई व कोलकात्यातील मुलाने आत्महत्या केली होती. इंदूर व सोलापूरच्या एका मुलाला वाचवण्यात आले आहे. या गेमचा वाढता धोका पाहता केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्यासोबत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निर्देश देत गेम त्वरित हटवण्यास सांगितले आहे. सरकारने म्हटले की, कोणी गेम खेळत असेल अथवा सर्च करत असेल तर त्वरित बंद करावा. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे यासंबंधी तक्रार प्राप्त झाली होती,अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘ब्ल्यू व्हेल’गेम तयार करणाऱ्यांनी बनवला बनावट आयपी अॅड्रेस
ब्ल्यू व्हेल गेम निर्मात्यांनी बंदीच्या शक्यतेमुळे याआधीच बनावट किंवा प्रॉक्झी यूआरएल, आयपी अॅड्रेस तयार केले आहेत. याशिवाय ते सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. याबाबत गुगल व अॅपलने दैनिक भास्करला सांगितले की, त्यांच्या प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्धच नाही. हिंसाचाराला उत्तेजन देणारे गेम आमच्या धोरणाविरुद्ध आहेत, असे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले. अॅपलचे प्रवक्ते आनंद भास्करन यांनीही आम्ही अशा प्रकारचे गेम प्लॅटफॉर्मवर ठेवत नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील विधिमंडळातही या गेमवर बंदी आणण्याची मागणी करण्यत आली होती.

- रशिया, ब्राझील, अर्जेंटिनासह जवळपास १९ देशांत ३०० वर तरुणांनी केल्या आत्महत्या
- बंदी घालणारा भारत कदाचित पहिलाच देश
 
बातम्या आणखी आहेत...