आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत डिझेलच्या नव्या वाहनांवर बंदी, राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत नव्या डिझेल वाहनांची नोंदणी होणार नाही. त्याचबरोबर १० वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरणही होणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी हा अंतरिम उपाय केला आहे. दरम्यान, १२ इतर शहरांत डिझेल गाड्यांवर प्रतिबंध लावण्यासाठीच्या जनहित याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने दिल्लीत प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी केली. लवादाने केंद्र व दिल्ली सरकारलाही आपल्या विभागांसाठी डिझेलची नवी वाहने खरेदी न करण्याच्या निर्णयावर विचार करावा, अशी सूचना केली. अॅड. अरविंद गुप्तांनी दिल्लीसह १३ शहरांत प्रदूषण कमी करण्यासाठी २०१३ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर लवकर सुनावणीचा आग्रहही धरला. त्यावर सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, मंगळवारी त्यावर सुनावणी होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...