आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक एकाकी, सार्क परिषद रद्द; 8 पैकी 5 देशांचा परिषदेत सहभागास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याच्या दृष्टीने भारताला बुधवारी मोठे यश मिळाले. नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादेत होत असलेल्या दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटनेच्या (सार्क) परिषदेवर बहिष्कार टाकण्याच्या भारताला निर्णयाला पाठिंबा देत बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या सदस्य देशांनीही परिषदेवर बहिष्कार टाकला. सार्कच्या नियमानुसार एकही सदस्य देश उपस्थित राहणार नसेल तर परिषदच रद्द होते.
म्हणजेच इस्लामाबादेतील सार्क परिषद रद्द होणार हे निश्चित झाले आहे. तरीही सार्कचे विद्यमान अध्यक्ष व नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांची निर्णयावर स्वाक्षरी होणे बाकी आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगून, ‘कुणी देश आले किंवा नाही तरी सार्क परिषद होईलच,’ असा दावा केला.
परिषदेवर बहिष्कार टाकणाऱ्या देशांनुसार, विभागीय सहकार्य आणि दहशतवाद अशी एकत्र वाटचाल शक्य नाही. दरम्यान, संघटनेतील श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ या देशांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
पाकिस्तान अस्वस्थ
इस्लामाबाद - ५६ वर्षांपूर्वींचा भारत-पाकमधील सिंधू नदी पाणीवाटप करार रद्द होण्याची शक्यता पाहता पाकिस्तानने जागतिक बँकेचे दार ठोठावले आहे. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...