आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटी बॅंक खात्यांचा डेटा लीक; राजधानीत टोळीचा पर्दाफाश, म्होरक्या जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी या टोळीचा मास्टरमाइंड पूरण गुप्ता याला अटक केली - Divya Marathi
पोलिसांनी या टोळीचा मास्टरमाइंड पूरण गुप्ता याला अटक केली
नवी दिल्ली - राजधानीत पोलिसांनी एका मॉड्युलचा भांडाफोड करून तब्बल एक कोटी बँक खात्यांचा डाटा लीक झाल्याची माहिती जाहीर केली. ही टोळी एक कोटींहून अधिक लोकांचे बँक खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, तसेच फेसबूक, व्हॉट्सॅपचा तपशील इतर कंपन्यांना विकला. मॉड्युलच्या मास्टरमाइंडला अटक करयात आली आहे. बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा कारभार सुरू होता. 
 
- दक्षिण पूर्व दिल्लीचे डीसीपी आर बानिया यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिल्लीतील ग्रेटर कैलास येथे राहणाऱ्या एका 80 वर्षीय महिलेच्या तक्रारीवर तपास करताना कोट्यवधी खाते लीक करणाऱ्या टोळीचा छळा लागला. या मॉड्युलने बँकेत आणि कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांकडून ही माहिती काढली होती. हेच अधिकारी त्यांना कार्डवरील सीव्हीव्ही आणि ओटीपी क्रमांक सुद्धा सांगत होते. या टोळीने संबंधित ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून क्रेडिट कार्ड मार्फत तब्बल 1.46 कोटी रुपये लंपास केले होते. 
 
50 हजार लोकांचा डाटा 10-20 हजारांत विकला
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, या टोळीचा मास्टरमाइंड पूरण गुप्ता याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने 50 हजार लोकांचा बँक, सोशल मीडिया आणि क्रेडिट व डेबिट कार्ड डाटा 10 ते 20 हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली.
- तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या माहितीमध्ये लोकांचे बँक खाते, क्रेडिट व डेबिट कार्डचा तपशील आणि पासवर्ड, जन्मतारीख आणि इतर महत्वाच्या माहितीचा समावेश आहे.
 
एकगठ्ठा माहिती विकण्याचा धंदा
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी आपल्याकडे जास्तीत-जास्त लोकांची माहिती गोळा करून ती एकगठ्ठा विकत होती. प्रत्येक व्यक्तीमागे 20 पैसे असा यांचा दर होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरू असून यात अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...