आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक कर्मचाऱ्यांची माहिती सार्वजनिक नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोणत्याही बँकेच्या क्लेरिकल स्टाफची बदली व पोस्टिंगबाबतची माहिती खासगी स्वरूपाची असते. ती आरटीआयअंतर्गत सार्वजनिक करता येत नाही, असा निर्वाळा सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. आर.के. अग्रवाल आणि न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या पीठाने केरळ हायकोर्ट व केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश फेटाळले अाहेत. कॅनडा बँकेच्या व्यवस्थापनाला त्यांचा क्लेरिकल स्टाफची बदली आणि पोस्टिंगची माहिती आरटीआयअंतर्गत द्या, असा तो आदेश होता. न्यायालय म्हणाले, बँकेच्या कर्मचाऱ्याची माहिती ही त्यांची खासगी माहिती आहे. 
बातम्या आणखी आहेत...