आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनधन खातेदारांना एका महिन्यात काढता येणार फक्त १० हजार रुपये, RBI ने घातल्या मर्यादा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनधन खातेदारांना त्यांच्या खात्यातून एका महिन्यात जास्तीतजास्त १० हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या निर्देशानुसार, केवायसी पूर्ण केलेल्या जनधन खातेदारांना त्यांच्या खात्यातून एका महिन्यात फक्त १० हजार रुपये काढता येणार आहेत. दुसरीकडे केवायसी पूर्ण न केलेल्या खातेदारांसाठी ही मर्यादा ५ हजार रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
आरबीआयने बुधवारी जारी केले नोटीफिकेशन
- आरबीआयच्या नोटीफीकेशननुसार नो यूवर कस्टमर (केवायसी) बाबतची पूर्ण माहिती दिलेल्या खातेदारांना एका महिन्यात जास्तीतजास्त १० हजार रुपये काढता येऊ शकातात.
- आरबीआयने हे देखिल स्पष्ट केले आहे की खातेधारकाला जर महिन्याभरात यापेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर बँक मॅनेजरच्या पूर्वपरवानगीने ते आणखी १० हजार रुपये काढू शकतात. मात्र बँक मॅनेजरने हे जाणून घेतले पाहिजे की खरोखर खातेधारकाला अधिक पैशांची गरज आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...