आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकरमधून चोरीला बँक जबाबदार नाही; आरटीआयअंतर्गत रिझर्व्ह बँकेने दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील एखाद्या बँकेच्या लॉकरमधून तुमची एखादी महागडी वस्तू चोरीला गेली तरी त्यासाठी बँक जबाबदार राहणार नाही. या बदल्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची भरपाईदेखील मिळणार नाही. बँक लॉकरमधील सामानाच्या सुरक्षेसाठी बँका जबाबदार नसल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 

१९ सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसंदर्भात माहितीच्या अधिकारात (आरटीआय) आरबीआयने ही माहिती दिली अाहे. रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खुलाशानंतर आरटीआयमध्ये माहिती मागवणारे वकील कुश कालरा यांनी भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय) मध्ये तक्रार दाखल केली आहे. लॉकर सेवेबाबत बँकांचा हा व्यवहार बाजार प्रतिस्पर्धेच्या विरोधात असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. लॉकरमधील वस्तूंसंदर्भात रिझर्व्ह बँकेची बँकांना स्पष्ट नियमावली देण्यात आलेली नाही. त्यामुळे या वस्तूंची जबाबदारी घेण्यास बँकाही तयार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...