आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banks Not Lowering EMIs Is 'Nonsense', Says Raghuram Rajan

खडसावताच व्याजदर घटले; पण २५ लाखांच्या कर्जावर २५० रुपयेच लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/दिल्ली - व्याजदरावरून रिझर्व्ह बँक अन्य बँकांत मंगळवारी दिवसभर रस्सीखेच झाली. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सकाळी रेपो दर आणखी कमी करण्यास नकार दिला. बँकांनी कर्ज स्वस्त केले तरच त्यात घट होईल, असे ते म्हणाले. त्यांनी बँकांना खडे बोलही सुनावले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, स्वस्त कर्ज केवळ जमा रकमेच्या व्याजावर ठरत नाही तर लिक्विडिटी, कर्जाची मागणी स्पर्धेवर निर्धारित होते. आयसीआयसीआयच्या चंदा कोचर, एचडीएफसीचे आदित्य पुरींनी हाच युक्तिवाद केला. पण सायंकाळी या तीन बँकांसह लक्ष्मीविलास बँकेनेही व्याजदरात कपात केली.

भास्कर एक्स्पर्ट
गव्हर्नर नाराजीतच दिसले…

नाराजीखासगी बँकांवर जास्त होती. त्यांचा खर्च कमी असतो. त्यांनी आधीच कर्ज स्वस्त केले पाहिजे होते.

मग स्वस्त करत का नाहीत?
बँकांचेकर्ज अडकलेले आहे. यामुळे त्यांचा विश्वास बसत नाही. त्या कर्ज देण्यात सावधगिरी बाळगत आहेत.

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांना बजावले होते
याबँकांत सरकारी भागीदारी जास्त असली तरी इतरांकडेही शेअर्स आहेत. यामुळे नफ्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामगिरी वाईट झाल्यास उत्तर देण्यासाठी सरकार थोडेच येणार आहे.

कर्जाला मागणी का नाही?
पर्चेसिंग पॉवर वाढत नाही. घरविक्री मंदच आहे. कर्ज 0.5 टक्क्याने स्वस्त केले तरी मोठा फरक पडणार नाही.

मग,मोठी दरकपात कधी?
रब्बी,महागाई, जीडीपीचे आकलन झाल्यानंतरच. सप्टेंबर-अॉक्टोबरपर्यंत अर्धा ते एका टक्क्याची कपात शक्य.
-बी.बी. भट्टाचार्य, अर्थतज्ज्ञ

आयसीआयसीआय ने0.25% कमी केले व्याजदर
बेस रेट 10 ऐवजी 9.75%होईल.10एप्रिलपासून लागू.
परिणाम गृहकर्ज : 20 वर्षे मुदतीच्या प्रतिलाख कर्जाचा ईएमआय फक्त 17 रुपयांनी कमी. तुम्ही25 लाख कर्ज घेतले असेल तर फक्त 425 रुपये बचत होईल.

एसबीआय एचडीएफसी बँकेने0.15% व्याजदर घटवले.
- दोन्ही बँकांचा बेस रेट आता 10 ऐवजी 9.85%होईल.
परिणाम गृहकर्ज : 20वर्षे मुदतीच्या प्रतिलाख कर्जाचा ईएमआय फक्त 10 रुपयांनी कमी.
तुम्ही 25 लाख कर्ज घेतले असेल तर फक्त 250 रुपये बचत होईल.
वाहनकर्ज : 5 वर्षांच्या कर्जावर प्रति लाख ईएमआयमध्ये 7.50 रु. घट
अंमल: 10 व 13 एप्रिलपासून.

राजन यांचे बँकांना खडे बोल
- रेपो दर वाढवल्यावर बँका कर्ज महाग कसे करतात? तेव्हा बेस रेट आड येत नाही का? व्याज कमी
- आताही कर्जाची मागणी आहे. बँका पैसे घेऊन बसल्या आहेत. नव्या जमा रकमेवरील खर्च घटला आहे. कर्ज स्वस्त करण्याची बँकांची इच्छाच नाही.

बँकांचे उत्तर
नवीन जमेवरील खर्च घटला; पण बँकांकडे एफडीची जुनी जमाही आहे. त्यामुळे सरासरी खर्च जास्त आहे. एप्रिलमधील पुनर्रचित कर्जही एनपीए होईल. अशा वेळी नफा कमी होऊ शकतो.

खर्च कमी होत नाही, हे बँकांचे म्हणणे फालतूपणा आहे. आता बँकांनी व्याजदर कमी केल्यावरच रेपो दरात कपात होईल. रेपो दर वाढवल्यावर तत्काळ व्याजदर वाढवता, मग कमी केल्यावर तसे का नाही करत? - रघुराम राजन