आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडे -गडकरींवर भ्रष्‍टाचाराचे आरोप करून दिली होती भाजपला सोडचिठ्ठी, आता होणार राज्‍यपाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली / नागपूर - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नजमा हेपतुल्‍ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसाम आणि व्‍ही. पी. सिंग बदनोर यांची पंजाबच्‍या राज्‍यपालपदी निवड केली. दरम्‍यान, जगदीश मुखी यांच्‍यावर अंदमान निकोबारच्‍या नायब राज्‍यपालाची कमान सोपवली आहे.
विदर्भातून चौथे राज्‍यपाल
यापूर्वी विदर्भातील यवतमाळ जिल्‍ह्याचे सुपुत्र सुधाकरराव नाईक हिमाचल प्रदेशचे आणि रा. सु. गवई बिहार आणि केरळचे राज्‍यपालपद भूषवले. या शिवाय नागपूरच्‍या रजनी राय या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्‍ये पॉन्डिचेरीच्‍या नायब राज्‍यपाल होत्‍या. आता पुरोहित विदर्भातून चौथे राज्‍यपाल ठरले आहेत.
पुरोहितांनी अगोदर कॉंग्रेस, नंतर भाजप सोडून स्‍थापन केला होता स्‍वत:चा पक्ष
> बनवारीलाल पुरोहित यांनी कॉंग्रेसमधून आपल्‍या राजकीय जीवनाला सुरुवात केली.
> नागपूर लोकसभा मतदार संघातून 1984 आणि 1989 अशा दोन वेळा ते कॉंग्रेसकडून निवडून गेले होते.
> राम मंदिराच्‍या प्रश्‍नावरून त्‍यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्‍ये प्रवेश केला.
> त्‍यावेळी 1991 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत त्‍यांना कॉंग्रेसच्‍या दत्‍ता मेघेंकडून पराभव स्‍वीकाराला लागला होता.
> त्‍यानंतर 1996 मध्‍ये भाजपच्‍या तिकिटावर ते नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.
गडकरी, मुंडे आणि महाजनांवर भ्रष्‍टाचाराचा आरोप करून भाजपला सोडचिठ्ठी
पुरोहित यांनी 1998 मध्‍ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. एवढेच नाही तर तत्कालीन भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर कोळसाखाण प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांनी केला होता. महाजनांसोबत गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यावर ही त्यांनी आरोप केले होते. पण, 2009 मध्‍ये त्‍यांनी नागपूर नागपूरमध्ये भरलेल्या भाजपच्या अधिवेशनात पुन्‍हा भाजपमध्‍ये प्रवेश केला. या काळात त्‍यांनी विदर्भ राज्य पक्षाची स्थापना केली होती.
फडणवीसांकडून गुरू दक्षिणा ?
राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नागपूरचे असून, ते पुरोहितांना आपले राजकीय गुरू मानतात. त्‍यामुळे पुरोहितांची राज्‍यपालपदी निवड म्‍हणजे फडणवीसांकडून त्‍यांना मिळालेली गुरूदक्ष‍िणाच आहे, अशी चर्चा नागपूरच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, इतर नवनिर्वाचित राज्‍यपालांबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...