आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाला तोंड : राजपथावर परेड दरम्यान च्विंगम चघळताना कॅमेरात कैद झाले ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहूणे म्हणून राजपथावर उपस्थित होते. पण, राजपथावरील कार्यक्रमा दरम्यान ओबामा च्विंगम चघळत असल्याचे समोर आले आहे.
परेड चालू असताना ओबामा अनेक वेळा तोंडातील च्विंगम आत बाहेर करताना दिसल्याने त्यांच्या अशा प्रकारच्या वागणूकीमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच त्यांच्या आजच्या या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ओबामा राजपथावर आले त्यावेळी देखील त्यांच्या तोंडामध्ये च्विंगम होते. ओबामा ज्यावेळी च्विंगम चघळत होते त्यावेळी त्यांच्या बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करत होते. दरम्यान,परेड सुरू असताना ओबामा च्विंगम चघळत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या POTUS' chewing gum नावाने ट्विटरवर अनेक ट्विट करण्यात येत आहेत.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्वीट केले की - बराक भाऊंनी त्यांच्या जबड्यांना कामाला लावले आहे आणि ते च्विंगम चावत आहेत. कमीत कमी तो गुटखा नसावा. पण परेड कार्यक्रमात च्विंगम चघळने गरजेचे होते.