आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama To Cut Short India Trip, Won\'t Visit Taj Mahal

बराक ओबामा अमेरिकेतून भारताकडे रवाना, जर्मनीत विश्रांती घेऊन दिल्लीत पोहोचणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकीचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा आज सायंकाळी अमेरिकतून भारताकडे रवाना झाले आहेत. जर्मनीत विश्रांती घेऊन ते नवी दिल्लीकडे त्यांचे विमान झेप घेईल. रविवारी सकाळी 10 वाजता त्यांचे स्‍पेशल एयरफोर्स वन विमान नवी दिल्‍लीतील पालमस्थि‍त मिलिट्री एयरबेसवर उतरेल. अमेरिकेतून रवाना होण्यापूर्वी ओबामांनी आग्रा येथे जाता येणार नसल्याने खेद व्यक्त केला.
दरम्यान, भारतात पसरलेल्या स्वाईन फ्लूवरून अमेरिकन सुरक्षा यंत्रणा चिंतित आहेत. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी स्वाईन फ्लू बाबत एक अहवाल दिला आहे. त्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणा बराक ओबामांच्या जेवणात चिकनचा समावेश करू नये हे सांगण्याची शक्यता आहे.
ओबामांचे ताजमहल दर्शन रद्द- ओबामा यांनी आपल्या तीन दिवसाच्या भारत दौ-यातील काही तास कमी करून सौदी अरेबियात जाणार आहेत. सौदी अरोबियाचे राजा अब्दुल्ला यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. ओबामा तेथे जाऊन शोक व्यक्त करणार आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान व्हाईट हाउस यांच्याकडून ओबामांच्या पुढील आठवड्यातील वेळपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात मंगळवारी आग्रा भेटीचा उल्लेख होता मात्र, शनिवारी या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ओबामांना आता पत्नी मिशेलसोबत ताजमहल पाहता येणार नाही.