आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचा भारत दौरा संपला, तज्ज्ञांच्या मते मोदी World Leader बनण्याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सौदीकडे रवाना होता नमस्कार करताना बराक आणि मिशेल ओबामा.
नवी दिल्ली - तीन दिवसांच्या दौर्‍यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा सौदी अरेबियाकडे रवाना झाले आहेत. सौदीमध्ये तेथील शासकाच्या निधनानंतर अमेरिकेच्या वतीने बराक ओबामा त्यांचा शोक व्यक्त करणार आहे. या भारताचा ऐतिहासिक दौरा संपवून परतताना ओबामांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे. दरम्यान, या दौर्‍यातून मोदींनी जागतिक नेते बनण्याच्या दिशेने प्रतिमा तयार केली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दुपारी बरोबर 1. 50 वाजता बराक ओबामा पालम विमानतळावर दाखल झाले. याठिकाणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ओबामांना निरोप दिला. यावेळी अधिकार्‍यांचीही उपस्थिती होती. बराक ओबामा यांनी विमानात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा एकदा भारतीय पद्धतीने नमस्कार करत भारतीय दौर्‍याचा समारोप केला. त्यानंतर ओबामा आणि मिशेल यांनी विमानात प्रवेश केला आणि दोन वाजेच्या सुमारास विमान सौदीकडे रवाना झाले.
तज्ज्ञांच्या मते या दौर्‍यामुळे जेवढा फायदा भारताला झाला आहे तेवढाच ओबामांचा हा दौरा नरेंद्र मोदींसाठीही फायद्याचा ठरला आहे. बराक ओबामांशी जवळीक निर्माण झाल्याचेन त्यांच्या जागतिक प्रतिमेला एक नवीन झळाळी मिळाली आहे. त्याशिवाय यशस्वी अणुकरार, अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे आश्वासन आणि दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांना मिळालेली नवी उंची, यामुळे मोदींचे नेतृत्त्व सिद्ध झाले आहे. तज्ज्ञांच्या मते भारताबाबत अमेरिकेचा दृष्टीकोन बराच बदलला आहे.

वैश्विक नेतृत्त्वाचा नवा चेहरा बनले पीएम मोदी
मेमध्ये सत्ता सांभाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 पेक्षा अधिक परदेश दौरे केले आहेत. त्यातून त्यांनी भारताच्या नवीन प्रशासनाबाबत प्रतिमा तयार केली. तीच त्यांची प्रतिमा बनली आहे. मोदींना सत्ता स्थापन करताच जागतिक नेत्यांमध्ये ओळख मिळाली होती. पण या दौर्‍यात मोदी आणि ओबामांची जी ट्युनिंग पाहायला मिळाली त्यामुळे संपूर्ण जगात संदेश गेला आहे. या दौर्‍यावर लक्ष असलेल्या जागतिक माध्यमांना हे समजले आहे की, मोदी हे एक असा चेहरा आहे जो भारताबरोबरच जागतिक नेतृत्वाला नवी दिशा देण्यासही सक्षम आहे.

देशात प्रतिमा आणखी उंचावली
अणुकरार, चार अब्ज डॉलरची गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात भागीदारी अशा महत्त्वाच्या मुद्यांवर अमेरिका आणि भारतादरम्यान सहमती झाल्याने देशातही मोदींची प्रतिमा उंचावली आहे. अणुकरारावर शिक्कामोर्तब करत मोदींनी अमेरिकेबरोबरच गेल्यावेळी सत्तेत असलेल्यांबरोबरही आपल्याला संबंध चांगले ठेवायचे असल्याचे संकेत दिले. विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि मेक इन इंडियाअंतर्गत गुंतवणुकीसाठी ओबामांनी देशातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ, उद्योगपती यांच्या बैठकीचे आयोजनही केले होते. त्यात गुंतवणुकीच्या रुपात मोठी मोठी आश्वासने मिळाली.

ओबामांचा एकेरी नावाने उल्लेथ करणे आणि हैदराबाद हाऊसच्या लॉनमध्ये चाय पर चर्ता करत मोदींनी जागतिक नेत्यांबरोबरच देशातील नेत्यांनाही आपण देशाला स्वतःच्या रंगात रंगवू इच्छित असल्याचा स्पष्ट संदेश दिला. आधीच स्टाइल आयकॉन म्हणून प्रसिद्ध झालेल्या नरेंद्र मोदींच्या ड्रेसिंग सेंसचेही ओबामांनी कौतुक केले.
पुढील स्लाइडवर पाहा PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा ओबामा आणि मोदींनी केलेले ट्वीट...