आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Batla House Encounter Case Shahjad Ahamad To Lifetime Punishment

बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणातील मुख्य आरोपी शहजाद अहमदला जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी शहजाद अहमदला या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्लीतील साकेत कोर्टाने गेल्या 25 जुलैला शहजाद याला पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांची हत्या आणि अन्य पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तेव्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्रकुमार यांनी 29 जुलै ही शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित केली होती. सोमवारी फिर्यादी आणि बचाव पक्षांचे युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. शहजादला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी विशेष सरकारी वकील सतविंदर कौर यांनी केली. दिल्लीमध्ये सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या सहा दिवसांनंतर बाटला हाऊस एन्काउंटर झाले होते. त्यात पोलिस निरीक्षक शर्मा आणि दोन संशयित दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहंमद साजीद मारले गेले होते.

दरम्यान, 19 डिसेंबर 2008 रोजी बाटला हाऊस परिसरातील एका घरात पाच दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. शहजाद अहमद आणि जुनैद पळून जाण्यात यशस्वी झाले होते तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. मात्र, पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना वीरमरण आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शहजाद उर्फ पप्पू यास उत्तर प्रदेशातील आझमगड येथे अटक केले होते.

शहीद शर्मा यांना सात शौर्यपदक देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यात एका राष्ट्रपती पदकाचाही समावेश आहे. शर्मा यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि दोन मुले आहेत.