आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Batla House Encounter: Court To Pronounce Sentence Today

बाटला एन्काउंटर प्रकरणी शहजादच्या शिक्षेचा निर्णय उद्यापर्यंत सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील बाटला हाउस एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या शहजाद अहमद उर्फ पप्पूच्या शिक्षेचा निर्णय कोर्टाचे न्‍यायाधीश राजेन्‍द्र कुमार शास्‍त्री यांनी उद्यापर्यंत (दि.25) सुरक्षित ठेवला आहे. शहजादला आज (सोमवार) शिक्षा सुनावली जाणार होती. शहजाद याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. तर शहजादच्या वकीलांनी तुरुंगावासाच्या शिक्षेची मागणी केली होती.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत साकेत कोर्टाने शहजाद याच्यावर पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

दरम्यान, सन 2008 मधील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर बनावट नसल्याचा निर्णय गेल्या गुरूवारी साकेत कोर्टाने दिला होता. दहशतवादी संघटना इंडियन मुझाहिद्दीनचा कथित सदस्य शहजाद अहमद याला अखेर दोषी ठरवण्यात आले होते. या एन्काउंटरदरम्यान पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्यावर शहजाद यानेच गोळ्या झाडल्या होत्या, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले होते.

इंडियन मुझाहिद्दीनचा हस्तक असलेल्या शहजाद अहमद याला हत्या आणि अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार शास्त्री यांनी निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 70 जणांची साक्ष तपासण्यात आल्या होत्या.
दोषी ठरवण्यात आलेल्या शहजाद याला फाशीचीच शिक्षा झाला पाहिजे, अशी मागणी शर्मा यांच्या 76 वर्षीय आई देविंदर देवी यांनी केली होती.
दरम्यान, 19 डिसेंबर 2008 रोजी बाटला हाऊस परिसरातील एका घरात पाच दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.शहजाद अहमद आणि जुनैद पळून जाण्यात यशस्वी झाले होते तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते.मात्र, पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना वीरमरण आले होते.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शहजाद उर्फ पप्पू यास उत्तर प्रदेशातील आझमगड येथे अटक केले होते.
शर्मा यांना सात शौर्यपदक देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यात एका राष्ट्रपती पदकाचाही समावेश आहे. शर्मा यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि दोन मुले आहेत. शर्मा 1989 मध्ये दिल्ली पोलिस दलात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, 'बाटला हाऊस एन्काउंटर बनावट- दिग्विजयसिंह'