आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पराभवावरून काँग्रेसमध्ये जुंपली, माकन-दीक्षित वादात सोनियांची मध्यस्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत सफाया झाल्याबद्दल काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अजय माकन यांच्यावर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या, मला माकन यांची दया येत आहे. सर्वकाही एकट्यानेच करू, असे त्यांचे विचार होते. यामुळे त्यांनी इतर कुणाला सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या स्टाइलमुळे पक्षाला फायदा झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. दीक्षित यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यस्तीचा प्रयत्न केला. बड्या नेत्यांना खुलेआमपणे फटकारले. पक्षाचे दिल्ली प्रभारी पी.सी. चाको यांनी सांगितले की, सोनिया म्हणाल्या- मोठ्या नेत्यांची एकमेकांविरुद्धची वक्तव्ये दुर्दैवी आहेत.त्यांनी संयम दाखवायला हवा.

पुढे वाचा,