आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Is Planning To Change Management Of CSK And Rajasthan Royals

CSK-RR ला IPL-9 मध्ये खेळण्याची संधी, BCCI करत आहे व्यवस्थापन बदलाचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी - Divya Marathi
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी
नवी दिल्ली - सट्टेबाजीच्या आरोपानंतर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलेले आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगली बातमी आहे. दोन्ही संघांना आगामी आयपीएल-9 मध्ये नव्या व्यवस्थापनासह खेळण्याची संधी मिळू शकते. आयपीएल वर्किंग कमिटीने हा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.
जस्टिस लोढा समितीने दोन्ही संघावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. लोढा समितीच्या निर्णयांचा राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर आणि सौरव गांगुली यांसारखे सदस्य असलेली आयपीएल वर्किंग कमिटी आभ्यास करत आहे. समितीने दिलेल्या निर्णयाचा आभ्यास करुन वर्किंग कमिटी आयपीएल-9 चा रोडमॅप तयार करणार आहे. वर्किंग कमिटी 28 ऑगस्ट पर्यंत आपला अहवाल बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला देणार आहे.
दोन्ही संघातील खेळाडूंमुळे घेणार निर्णय
चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत. त्यांचा विचार झाला पाहिजे या अनुषंगाने आयपीएल वर्किंग कमिटीने बीसीसीआयला हा सल्ला दिला आहे. नव्या व्यवस्थापनासाठी वित्तीय संस्था किंवा बँकांचा विचार होऊ शकतो.
सुप्रीम कोर्टाच्या समितीने घेतलेले महत्त्वाचे निर्णय
व्यक्ति/टीम
कोण काय होते?
काय होता रोल?
समितीने काय निर्णय घेतला?
गुरुनाथ मयप्पन
श्रीनिवासन यांचे जावई, चेन्नई सुपरकिंग्जचे टीम प्रिंसिपल.
भ्रष्टाचार आणि सट्टेबाजी.
आजीवन बंदी.
राज कुंद्रा
राजस्थान रॉयल्सचे को-ओनर.
सट्टेबाजी, पंटर आणि बुकीजच्या संपर्कात होता.
आजीवन बंदी.
चेन्नई सुपरकिंग्ज
2010 आणि 2011 मध्ये आयपीएल विजेते.
टीम प्रिंसिपल ने गड़बडकेल्याचा आरोप, इंडिया सीमेंट्सने कारवाई केली नाही.
दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये बंदी.
राजस्थान रॉयल्स
2008 चेआयपीएल विजेते.
टीमच्या मालकाने केली सट्टेबाजी.
दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये बंदी.
सुंदर रमण
आयपीएलचे सीओओ.
विंदू दारासिंहसोबत 350 वेळा फोनवर बोलणे झाल्याचा आरोप.
सुप्रीम कोर्टाच्या समितीने म्हटले, रमणविरोधात चौकशीची गरज.
सध्याचे 50 क्रिकेटर्सCSK आणि RR शी जोडले गेलेले.कोणीच आरोपी किंवा दोषी नाही.
यांच्या भविष्याबद्दल सस्पेन्स कायम.