आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बीटिंग द रिट्रीट\' मध्ये 35 बॅंड्सनी दाखवले कौशल्य, वाजल्या 20 धुन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम समारोपाचे प्रतिक म्हणून आज दिल्लीतील विजय चौकात ‘बीटिंग द रिट्रीट’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीनही सेनेने आपल्या बॅंड्सने आपले कौशल्य दाखवले. यंदाच्या समारंभात 33 बॅंड़्सनी सहभाग घेतला. यात 15 मिलिट्रीचे बॅंडस तर 18 पाईप आणि ड्रम्स बॅंड्सने कार्यक्रमात सहभाग घेतला. इंडियन नेवी आणि एयरफोर्सच्या एका-एका बॅंड्सचाही यात कार्यक्रमात समावेश होता.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी पारंपरिक पद्धतीने आपल्या शाही बग्‍गीत सवार होत विजय चौकात पोहचले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील बहुतेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. समारंभाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलाच्या प्रमुखांची भेट घेतली.
पुढे वाचा, बीटिंग द रिट्रीटदरम्यान फोटो...