आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beating Retreat Ceremony Held On Vijay Chowak Delhi

बीटिंग द रिट्रीट : आर्मीच्या बँडने प्रथमच सादर केले क्लासिकल म्युझिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चार दिवस चाललेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा शेवट शुक्रवारी झालेल्या 'बीटिंग द रिट्रीट सेरेमनी' ने झाला. विजय चौकात झालेल्या या सोहळ्यामध्ये यावर्षी पॅरामिलिटरी फोर्सेसही (निमलष्करी दल) सहभागी झाल्या होत्या. याआधी केवळ लष्कराच्या तिन्ही दलाचे रेजीमेंटल सेंटर, बटालियन आणि बँड यामध्ये सहभागी होत होते.

यावर्षीचे वैशिष्टय...
- यावर्षी बीटिंग रिट्रीटमध्ये 15 मिलिट्री बँड आणि 21 पाइप अँड ड्रम बँडही सहभागी होतात.
- प्रथमच स्टेट फोर्स आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसने यात सहभाग घेतला होता.
- सेरेमनीमध्ये प्रथमच क्लासिकल इंडियन म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंट्स वाजवण्यात आली होती.
- यावर्षीच्या बिटींग रिट्रीट सेरेमनीमध्ये वाजवण्यात आलेल्या 26 पैकी 20 चाली भारतीय संगीतकारांच्या होत्या.
- कदम-कदम बढाए जा, जय भारती, सॅम बहादूर, ढोला रे ढोला, ताकत वतन की हमसे है, सारे जहां से अच्छा, ग्रॅन्ड्योर, गॅलेक्सी रायडर,
एअरबोनच्या म्युझिकवर बँडने सादरीकरण केले.
- बीएसएफ, आयटीबीपी आणि दिल्ली पोलिसांच्या बँडनेही संविधान, अभिनंदन आणि करियप्पा म्युझिकवर सादरीकरण केले.
- यावर्षीच्या सेरेमनीचे प्रिंसिपल कंडक्टर कमांडर व्ही सी डिक्रूज आहेत.

मान्यवरांची उपस्थिती...
- राष्ट्रपती हे या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर असतात. पारंपरिक बग्गीतून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या सोहळ्याला विजय चौकात पोहोचले.
- पंतप्रधान नरेन्द्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, तसेच अनेक देशांचे राजदूत या सोहळयाला उपस्थित होते.

बीटिंग द रिट्रीट सेरेमनी..
- जगभरातील अनेक देशांमध्ये बीटिंग द रिट्रीटची जुनी परंपरा आहे.
- पारंपरिक युद्धाच्या वेळी जेव्हा सैन्य सूर्यास्तानंतर आपापली शस्त्रे ठेवून त्यांच्या कॅम्पमध्ये जात होते त्यावेळी त्याठिकाणी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.
- भारतात बिटींग रिट्रीटची सुरुवात 1950 च्या दशकात झाली होती. त्यावेळी भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट्स यांनी स्वतःचे मास्ड बँड तयार केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS