नवी दिल्ली - मारहाणीची एखाद-दुसरी घटना खरी आढळली तरी ती हुंड्यासाठीचा छळ ठरू शकत नाही, असे मत दिल्लीच्या सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे.
नणंद, दिरांनी हुंड्यासाठी
आपला छळ केला, अशी तक्रार एका महिलेने केली होती. मारहाणीची एखाद-दुसरी घटना खरी आढळली तरी त्याला हुंड्यासाठीचा छळ म्हणता येणार नाही. ४९८ अ मधील तरतुदीनुसार क्रूर वागणूक अथवा छळ ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. तक्रारकर्त्या महिलेचा छळ एवढा होत होता की तिला आत्महत्या करणे भाग पडल्याचे किंवा गंभीर जखमा झाल्या हे सिद्ध करणारे पुरावे हवेत, असे न्या. पुलस्त्य प्रमाचला यांनी म्हटले आहे.