आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती म्हणाले - पोलिस आमच्या ताब्यात द्या, दिल्लीत सुंदर महिलाही रात्री फिरू शकतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. भारतींनी सोमवारी म्हटले होते, की जर दिल्ली पोलिस आमच्या ताब्यात दिली तर सुंदर महिला देखील दिल्लीच्या रस्त्यांवरुन रात्रभर फिरू शकतील. आपण केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरू शकते याची कल्पना आल्यानंतर भारतींनी रात्री एक ट्विट करुन, माध्यमांनी माझे वक्तव्य मोडतोड करुन सादर करु नये असे अपील केले.
काय म्हणाले भारती
दिल्ली विधानसभेत सोमवारी महिला सुरक्षेवर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. तेव्हा भारती म्हणाले, 'मला पूर्ण विश्वास आहे की जर सुरक्षेची जबाबदारी दिल्ली सरकारवर देण्यात आली तर दिल्लीत रात्री देखील सर्व महिला बिनदिक्कत फिरू शकतील.' यानंतर रात्री त्यांनी एक ट्विट करुन माझे वक्तव्य हे महिलांच्या मौल्यवान दागिण्यासंदर्भातील होते असे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...