आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदींनी लजपतरायांना घातले भाजपचे उपरणे, माफी मागण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला भाजपचे उपरणे घालताना किरण बेदी.
नवी दिल्ली - थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला भाजपचे उपरणे घातल्यामुळे दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी नव्या वादात अडकल्या आहेत. कृष्णनगरमधून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी लजपतराय यांना अभिवादन करताना त्यांनी स्वत:च्या गळ्यातील भाजपचे उपरणे पुतळ्याला घातले व ते काढून पुन्हा स्वत:च्या गळ्यात अडकवले. त्यावरून राजकारण तापले आहे.

भाजपने किमान स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे तरी भगवेकरण करू नये, असे ‘आप’चे अरविंद केजरीवाल म्हणाले. बेदींनी माफी मागावी, असे काँग्रेसचे अजय माकन म्हणाले. अण्णा हजारे यांनीही बेदींवर बोलणे टाळले.