आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या विरोधात शिलॉंगमध्ये \'बीफ पार्टी\', भाजप नेत्यांनी घेतला आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिलॉंग (मेघालय)- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मेघायलचा दौर्‍यावर आहेत. मात्र, शहा यांना गोमांस बंदीवरून शिलॉंगमध्ये विरोधाचा सामना करावा लागत आहे. शिलॉंगमध्ये शहांना विरोध करण्यासाठी टीयूआर नामक एका दबाव गटाने 'बीफ पार्टी'चे आयोजन केले आहे. दुसरीकडे, भाजपच्या धोरणावरून पक्षाच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

बीफ पार्टीचे आयोजक एंजेला आणि तरुणने सांगितले की, फक्त बीफ बर्गर खाणे तसेच बीफ सूप शेयर करण्‍यासाठी बीफ पार्टीचे आयोजन करण्यात आलेले नाही. भाजपचे सिद्धांत आणि अमित शहा यांच्या निषेधार्थ विचार प्रकट करण्‍यासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय गीत-संगीताचाही कार्यक्रम होणार आहे. पार्टीत सहभागी होणार्‍यांना बॅनर, पोस्टर आत्रण बीफ बर्गर आणण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने नुकताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. राष्ट्रपतींनीही त्याला मंजुरी दिली. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बीफ खाण्यास सरकाने बंदी घातलेली नसल्याने कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. साहजिकच त्यावर आता वादविवाद झडू लागले आहेत. गोमांस खाण्यास बंदी घातलेल्या राज्यात हजारो लोकांचा रोजगारापासून वंचित राहावे लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

गोमांसवर बंदीच्या मुद्यावर भाजप नेत्यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपचे मेघालय शाखाध्यक्ष के.एस.लिंगदोह यांनी गोमांस बंदीला विरोध केला आहे. मी बीफ पार्टीला जाणार नाही. परंतु गोमांसवर बंदी घालण्यासोबतच कायदा बनवणे, हे राज्य सरकारचे काम असल्याचे लिंगदोह यांनी म्हटले आहे.
बंददरम्यान अमित शहा यांचा दौरा...
प्रतिबंधित दहशतवादी संघटना एचएनएल कउंसिलने अल्पसंख्याकांवर होणार्‍या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ शिलॉंगमध्ये 12 तासांचा बंद पुकाराला आहे. बंद दरम्यान, अमित शहा शिलॉंगच्या दौर्‍यावर आहेत. यापार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.