आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशा हाकलणाऱ्यांचा अधिकारी घेताहेत शोध, मोदींच्या शनिवारच्या कार्यक्रमाबाबत चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ ऑगस्टला ‘माझे सरकार’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जनतेशी संवाद साधण्याची इच्छा आहे. त्यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये एक टाऊन हॉल मीटिंगची तयारी सुरू झाली आहे. दोन हजार निवडक लोकांना आमंत्रण पाठवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, पण तयारीच्या वेळी एक नवी आणि वेगळीच सुरक्षाविषयक चिंता समोर आली आहे. तेथे मधमाशांचे एक मोठे पोळे दिसले आहे. जेथून पंतप्रधानांना व्यासपीठावर जायचे आहे तेथेच हे पोळे आहे. त्यामुळे अचानक मधमाशा आल्या तर काय करायचे, असा प्रश्न आहे.

कार्यक्रमासाठी आता खूपच कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे मधमाशांचे मोठे पोळे हटवणाऱ्या व्यावसायिक व्यक्तींचा शोध दिल्लीसह चार राज्यांत घेतला जात आहे. दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणातही अशा व्यावसायिक लोकांचा शोध घेतला जात आहे.
आणखीही दोन समस्या : स्टेडियममध्ये आणखी दोन समस्या भेडसावत आहेत. एक म्हणजे भटक्या कुत्र्यांची आणि दुसरी आहे ती येथे मैदानात होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्याची. त्यापैकी दोन समस्या तर सोडवल्या जातील. भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम दिल्ली महानगरपालिकेने सुरू केले आहे. आयोजन स्थळाजवळ होणाऱ्या सामन्याची तारीख पुढे ढकलण्यास आयोजकांनी सहमती दर्शवली आहे.
बातम्या आणखी आहेत...