आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांनी 1 मार्चपूर्वी स्टेंटच्या किमती क‌ळवणे अनिवार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टेंटच्या उत्पादक व आयातदार कंपन्यांनी १ मार्चपूर्वी किंमती कळवण्याचे निर्देश एनपीपीए या राष्ट्रीय औषध किंमत नियामकाने शनिवारी दिले आहेत. एनपीपीएने १३ फेब्रुवारी रोजी स्टेंटच्या किंमतीवर कॅपिंग लावले अाहे.
 
स्टेंटचे उत्पादन व आयात करणाऱ्या कंपन्यांना दर तिमाहीत उत्पादन/ आयात व विक्रीचा तपशीलही देण्यास सांगण्यात आले. स्टेंटच्या उत्पादकांनी एकिकृत आयपीडीएमएस स्टेंटच्या किमतीची माहिती एनपीपीएला ऑनलाइन द्यावी आणि त्याची एक प्रत सर्व राज्यांचे औषधी नियामक, सर्व वितरक, ठोक व किरकोळ विक्रेत्यांनाही द्यावी, असेही निर्देशांत म्हटले आहे. मात्र आयपीडीएमएस साॅफ्टवेअर विकसित होत असल्याने १ मार्च २०१७ पर्यंत सदरच्या माहितीची हार्ड कॉपी देण्यास सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...