आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Brith Anniversary Ambedkar's Landon Home Take Government

डॉ. आंबेडकरांचे लंडनचे घर जयंतीपूर्वी सरकार घेणार - बडोले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वी (१४ एप्रिल) खरेदी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिली.हे घर खरेदी करण्याची केंद्र शासन स्तरावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली.

बडोले यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. या वास्तूसाठी राज्य सरकारने ४० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. भारताचे लंडन येथील उच्चायुक्त रंजन मथाई यांच्यासमवेत मंगळवारी बैठक होणार असून त्यात कायदेशीर बाबींवर अंतिम निर्णय होणार आहे. या वास्तूत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील वस्तुसंग्रहालय उभारण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, अभ्यासिका या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले जाते. या विद्यार्थ्यांसाठी वास्तूचा उपयोग होणार आहे. देशाच्या दृष्टीने लंडन येथील हे घर प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.