आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Oath Delhi Future Chief Minister Arvind Kejriwal Active

शपथविधीआधी दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत अभूतपूर्व यश प्राप्त करणारे 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर पहिल्याच दिवशी कामाला प्रारंभ केला आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पहिल्यांदा शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यानंतर राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत मनीष शिसोदिया यांचीही उपस्थिती होती.

भेटीनंतर सिसोदिया म्हणाले, राजकीय भेदाभेद न करता दिल्ली सरकारला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले. दिल्लीतील अनेक मुद्द्यांवर केंद्राकडे मदत मागणार आहोत. केंद्राच्या मदतीसाठी दिल्लीचा पूर्ण विकास अशक्य आहे. केजरीवाल यांनी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली. ते गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन १४ तारखेच्या शपथविधी समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देणार आहेत. मोदी यांनी केजरीवाल यांना ६७ जागा जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी नायडू आणि राजनाथ यांनाही निमंत्रण दिले आहे.

पुढे वाचा, 'आप'ला प्राप्तिकर विभागाची नोटीस, केजरीवाल म्हणाले, मला अटक करा