आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Before Speaking Against Modi First Take Permission, What Speaks Also Informed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींविरुद्ध बोलण्याच्या 24 तास आधी मंजुरी घ्या, काय बोलणार तेही सांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोपबाजीला पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगाम घातला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांना त्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. कोणीही मोदी यांच्याविषयी बोलण्याच्या 24 तास आधी मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच आपण करणार असलेले वक्तव्यदेखील कळवावे लागणार आहे.


पक्षाने एम.व्ही. रमानी व दीपक अमीन यांना राष्‍ट्रीय मीडिया को-ऑर्डिनेटर म्हणून नेमले आहे. मोदींवर बोलण्याआधी त्यांचीच मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय मोदींवर वैयक्तिक हल्ला न करण्याचीही तंबी देण्यात आली आहे. मोदी यांच्या विकास मॉडेलवर टीकेची मात्र मुभा आहे. विशिष्ट प्रवक्तेच फक्त मोदींविरुद्ध बोलू शकतील, असेही सूत्रांनी म्हटले आहे. टीव्ही वाहिन्यांवर वक्तव्ये देणा-या प्रवक्त्यांवर अमीन आणि रमानी देखरेखही ठेवतील. राहुल यांच्या परवानगीशिवाय कोणालाही टीव्हीवर चर्चेत सहभागी न होण्याचे सांगण्यात आले आहे. तसे केल्यास कारवाई केली जाईल. धोरण सोडून कोणीही वक्तव्य करू नये, असे राहुल यांनी प्रवक्त्यांच्या कार्यशाळेत यापूर्वीच स्पष्ट केले होते.