आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम असल्यानेच सलमानला जामीन, साध्वी प्राची , बेदींचीही वादग्रस्त प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अभिनेता सलमान खानला ५ वर्षे सश्रम कारावास सुनावल्यानंतर शिक्षेला मिळालेली स्थगिती आणि जामिनावर दोन महिला नेत्यांनी दोन तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपच्या खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम असल्यानेच त्याला जामीन मिळाल्याचे विधान केले, तर व्हीव्हीआयपी तुरुंगवास टाळू शकतात, हे यातून सिद्ध झाल्याचे माजी आयपीएस अधिकारी व भाजप नेत्या किरण बेदी यांनी म्हटले आहे.

श्रीमंत व व्हीआयपींना उत्कृष्ट कायदेशीर मदत मिळू शकते, असा संदेश जनमानसात गेल्याचे ट्विट बेदी यांनी केले आहे. साध्वी प्राची यांनी सलमानला जामीन मिळाला यामागे त्याचे मुस्लिम असणे हेच यामागे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. मालेगाव येथील बाॅम्बस्फोट प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञा यांची सुटका करण्याची मागणीही भाजप खासदार साध्वी प्राची यांनी केली आहे.

व्हीआयपी सुटतात
तुम्ही व्हीआयपी, सेलिब्रिटी, श्रीमंत आणि विशेष व्यक्ती असाल तर तुम्हाला ‘उत्कृष्ट कायदेशीर साह्य’ उपलब्ध होऊ शकते व तुम्ही तुरुंगवास टाळू शकता.
-किरण बेदी, भाजप नेत्या

सलमान खान मुस्लिम नसता तर गरीब पीडितांना निश्चितच न्याय मिळाला असता.
- साध्वी प्राची