आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष बेजान दारूवाला यांचा दावा, मी पाहिल्‍या पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍तरेषा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवाला यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांच्‍याकडे हात दाखवून हस्‍तरेषांवरून जोतिष्‍य जाणुन घेतले आहे. दारूवाला यांनी या दाव्‍याला पुरावा म्‍हणुन एक जुना फोटोही दाखवला आहे. या फोटोमध्‍ये पंतप्रधान मोदी यांचा हात पाहताना दारूवाला दिसत आहेत. बेजान दारूवाला यांनी इंदुरच्‍या एका कार्यक्रमात हा दावा केला आहे.
आज रविवारी बिहारमधील मधुबनी येथे झालेल्‍या मेळाव्‍यात पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, बिहारमध्‍ये आधी केवळ जंगलराज होते, आता जंतर-मंतराच्‍या रुपातून त्‍याचा जुडवा भाऊ समोर आला आहे. या दोघांची या निवडणूकीत सफाई होईल असेही ते म्‍हणाले. नीतीश आणि लालूंना उद्देशून पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, ''माझा तंत्र-मंत्रावर नाही, तर लोकशाहीवर विश्‍वास आहे. हे लोक जेव्‍हा नाराज होतात तेव्‍हा बुवा बाबांजवळ जातात. या लोकांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. तुम्‍हाला जंतर-मंतर पाहिजे की, विकास ? असा प्रश्‍न विचारत मोदी यांनी लोकांची मते घेतली. मात्र, आता ज्योतिषी दारूवाला यांच्‍यासोबतचा मोदी यांचा फोटो समोर आल्‍याने मोदी विरोधी पक्षाच्‍या कात्रीत सापडू शकतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, दारूवाला व मोदी यांचा जुना फोटो, वाचा काय सांगितले होते भविष्‍य..