आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bengaluru Executive Behind Islamic States Top Twitter Account Channel Claims

बंगळुरु येथील मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह चालवतो ISISचे ट्विटर अकाऊंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्रिटनमधील चॅनल 4 ने दावा केला आहे की जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आयएसआयएसचे सोशल मीडिया अकाऊंट बंगळुरुचा एक व्यक्ती हँडल करत आहे. बंगळुरुमधील एक मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह आयएसआयएसचे ट्विटर अकाऊंट चालवत आहे. चॅनलने दावा केला आहे, की त्यांनी त्या व्यक्तीसोबत बातचीत देखील केली आहे.
चॅनेल 4 ने बंगळुरुमधील त्या व्यक्तीचे नाव मेहंदी असल्याचे सांगितले आहे. तो भारतातील एका कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह आहे. चॅनलच्या दाव्यानुसार, शमी विटनेस नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही व्यक्ती रोज ट्विटस करीत असते. या अकाऊंटवरुन केलेले ट्विट्स महिन्याभरात 20 लाख वेळा पाहिले जातात. या अकाऊंटचे जवळपास 18 हजार फॉलोअर्स आहे. याच नेटवर्कच्या माध्यमातून जिहादी आयएसआयएस समर्थकांची भरती करतात. हा त्यांचा मुख्य स्त्रोत आहे. चॅनलचे म्हणणे आहे, की आयएसआयएससाठी लढत असलेले दोन तृतीयांश दहशतवादी याच अकाऊंटला फॉलो करतात. त्यामुळे आयएसआयएससाठीचे हे सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग मानले जात आहे.

बंद केले ट्विटर अकाऊंट
चॅनलने म्हटले आहे, की मेहंदीने सांगितले की तो काही ब्रिटीश जिहादींसोबत जोडला गेलेला आहे. चॅनलच्या वृत्तानुसार, तो त्याच्या फेसबुक पेजवर नियमीत जोक्स आणि फनी फोटोज शेअर करत असतो. याशिवाय त्याच्या मित्रांसोबतच्या पार्टीची छायाचित्रे तो अपलोड करत असतो. चॅनलने त्याला संपर्क केल्यानंतर त्याने त्याचे @ShamiWitness ट्विटर अकाऊंट बंद केले. चॅनलचे म्हणणे आहे, की मेहंदी दिवसभर इस्लामिक स्टेट संबंधी हजारो ट्विट्स करत असतो. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून चॅनलने त्याचे पूर्ण नाव उघड केलेल नाही. भारतातून चॅनलच्या या दाव्यावर अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.