आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूरदर्शनवर आता सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिंदीसोबत अन्य सर्व भाषांतील चित्रपट आठवड्यात दोन दिवस दूरदर्शनवर लवकरच दर्शकांना बघायला मिळणार आहेत. 1 सप्टेंबरपासून दूरदर्शन या चित्रपटांचे प्रसारण करणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शनासाठी मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी दूरदर्शनने व्यापक योजनेची आखणी केली आहे. यासंदर्भात प्रेक्षक आणि चित्रपट निर्मात्यांकडून मागील अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती, असे दूरदर्शनचे महासंचालक त्रिपुरारी शरण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दूरदर्शनवर यापूर्वीसुद्धा नवे-जुने चित्रपट दाखवले जायचे, परंतु शरण यांनी दूरदर्शनच्या धोरणात काही बदल केले आहेत. नव्या धोरणानुसार, सर्वोत्कृष्ट राष्‍ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारप्राप्त चित्रपटांची दूरदर्शनवर प्रदर्शनासाठी निवड करण्यात येईल. याशिवाय भारताच्या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागासाठी निवडण्यात आलेले चित्रपटही प्रदर्शनासाठी अर्ज करू शकतील, अशी माहिती शरण यांनी दिली. दूरदर्शनने जगातील 16 मुख्य चित्रपटांची यादी तयार केली आहे. यात कान, बर्लिन, टोरांटो, लोकार्नाे आदी महोत्सवांचा समावेश आहे. या महोत्सवांमध्ये प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेले चित्रपट आठवड्यातून दोन दिवस निर्धारित वेळेत दाखवण्यात येणार आहेत. जे प्रीमियर चित्रपट असतील (दूरदर्शनच्या आधी अन्य कोणत्याच दूरचित्रवाणी नेटवर्कवर न दाखवण्यात आलेले) त्याच्या निर्मात्यास 25 लाख रुपये, तर जे अन्य वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले त्यासाठी 15 लाख रुपये देण्यात येतील. यासाठी निर्मात्यांनी दूरदर्शनला एकापेक्षा जास्त वेळा चित्रपट दाखवण्याचे अधिकार द्यावे लागतील.

वर्षभरात 104 चित्रपट दाखवणार
यापूर्वी दूरदर्शनकडून एखादा चित्रपट दाखवण्यासाठी निर्मात्यास 16 लाख रुपये दिले जायचे.नंतरच्या प्रसारणासाठी 8 लाख, तिसºया प्रसारणासाठी 4 लाख रुपये दिले जायचे. नव्या धोरणामुळे दूरदर्शनला फायदा होईल असे मानले जात आहे. 1 सप्टेंबरपासून प्रसारित केल्या जाणाºया चित्रपटांची निवड पूर्ण झाली आहे. वर्षभरात 104 राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दाखवण्यात येतील.